गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय, तुमसर जिल्हा भंडारा येथील विद्यार्थिनींच्या ग्रंथालयीन सेवा व साहित्य वापराच्या अभिप्रायाचा विश्लेषणात्मक अभ्यास

Authors

  • मंगेश वामनराव वागदे

Keywords:

महाविद्यालयीन ग्रंथालय, ग्रंथालयीन सेवा साहित्य

Abstract

महाविद्यालयीन शिक्षणामध्ये ग्रंथालय हे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेला पूरक असणारे महत्त्वाचे ज्ञानकेंद्र आहे. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजा, वाचनाची सवय, संदर्भ साहित्याचा वापर, स्पर्धा परीक्षा व रोजगारविषयक माहितीची आवश्यकता तसेच डिजिटल माहिती संसाधनांचा वापर यामध्ये महाविद्यालयीन ग्रंथालयाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. प्रस्तुत संशोधनाचा उद्देश गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय, तुमसर येथील बी.ए. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींच्या ग्रंथालयीन सेवा आणि ग्रंथालयातील विविध साहित्याच्या वापराबाबतचा अभिप्राय जाणून घेणे हा आहे. शैक्षणिक वर्ष 2025–26 मध्ये महाविद्यालयातील एकूण 265 विद्यार्थिनींपैकी 215 विद्यार्थिनींनी अभिप्राय फॉर्म भरून दिला. त्यामुळे अभ्यासाचा प्रतिसाद दर 81.13 टक्के आहे. विद्यार्थिनींच्या अभिप्रायाच्या आधारे ग्रंथालयाचा वापर, ग्रंथालयाची वेळ, नियम, पुस्तकांची उपलब्धता, दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ, स्पर्धा परीक्षा साहित्य, रोजगार व करिअरविषयक साहित्य, डिजिटल संसाधने, ग्रंथपाल व ग्रंथालय परिचर यांच्या सेवा आणि एकूण समाधान यांचे विश्लेषण करण्यात आले. अभ्यासातून असे दिसून आले की, विद्यार्थिनींचा ग्रंथालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकूणच सकारात्मक आहे. पाठ्यपुस्तके हा सर्वाधिक वापरला जाणारा साहित्य प्रकार असून स्पर्धा परीक्षा व रोजगारविषयक साहित्यालाही विद्यार्थिनींची चांगली मागणी आहे. ग्रंथालयाच्या एकूण सेवांबाबत बहुसंख्य विद्यार्थिनी समाधानी आहेत. तथापि, नवीन पुस्तके, ई-संसाधने, डिजिटल साहित्य, नियतकालिके आणि करिअरविषयक माहिती यांचा अधिक विस्तार करण्याची आवश्यकता विद्यार्थिनींच्या अभिप्रायातून दिसून येते. त्यामुळे विद्यार्थिनी-केंद्रित, आधुनिक आणि डिजिटल स्वरूपाच्या ग्रंथालयीन सेवा विकसित करण्याची आवश्यकता आहे.

Published

2026-11-05