विकसित भारत @ 2047 साठी आर्थिक सुधारणा

Authors

  • Dr. Dipak B. Gaikwad
  • Atul A. Jadhav

Keywords:

विकसित भारत, आर्थिक सुधारणा, अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था

Abstract

विकसित भारत @ 2047 हा एक 11 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आलेला महत्वाकांक्षी उपक्रम असून ज्याद्वारे भारत सरकार मार्फत भारताला त्यांच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षांमध्ये विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प सोडण्यात आलेला आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था म्हणून पुणे आलेली असली, तरी 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याची महत्वाकांक्षा सत्यामध्ये उतरविणे हे एक डोंगराएवढे आणि अवघड काम असणार आहे. याचे कारण विकसित राष्ट्र बनण्यासाठी आवशक्य असलेल्या गोष्टी सध्या करणे हे प्रचंड आव्हानात्मक आहे. सदर लेखामध्ये भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक असणाऱ्या महत्वाच्या बाबींचा आणि त्या सध्या करण्याच्या दृष्टीने राबवाव्या लागणाऱ्या महत्वाच्या आर्थिक सुधारणांचा आढावा घेणत्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर लेखासाठी आवश्यक माहिती हि साधनसामुग्रीचे दुय्यम स्रोत वापरून संकलित करण्यात आलेली आहे.

Published

2026-11-05