चैत कादंबरीतील स्त्रीचित्रण
Keywords:
चैत कादंबरीतील स्त्रीचित्रणAbstract
कादंबरी हा व्यामिश्र साहित्यप्रकार आहे. आशयाचा, घटना-प्रसंगांचा विस्तृत पट त्यामधून अभिव्यक्त होत असतो. एकविसाव्या शतकातील कादंबरीचे स्वरूप बदलले आहे. प्रामुख्याने मराठी ग्रामीण कादंबऱ्यांचा विचार केला, तर ग्रामीण अनुभवविश्व बदललेले दिसते. ग्रामीण कादंबऱ्यांमधून पूर्वी जी सोशिक स्त्रीची प्रतिमा पुढे आली होती, तिची जागा आता जगण्याचे ताणेबाणे स्वीकारून परिस्थितीशी एकरूप होणाऱ्या स्त्रीपात्रांनी घेतली आहे. ‘चैत’ कादंबरीत येणारे स्त्रीचित्रण याच प्रकारचे आहे. सदर संशोधन निबंधात या कादंबरीत आलेल्या स्त्रीचित्रणाचा अभ्यास केला आहे.
Published
2026-09-23
Issue
Section
Articles